नाशिक – भविष्य निधी (पी एफ) सभासदांनी भविष्य निधी दावा ऑनलाईन करतांना काय काळजी घ्यावी याबद्दल क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निधी सभासदांसाठी सर्व सुविधा डिजिटल पध्दतीने (ONLINE) सुरु केली आहे. त्यामुळे सभासदास भविष्य निधी मधून आगाऊ उचल (Advance), अंतिम सेटलमेंट (Final settlement) व इतर दावे करण्यास खूप सोपे झाले आहे. परंतु दावे करतांना खालील बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे, त्या बाबतीत मुख्य कार्यालय न्यू दिल्ली यांनी आदेश क्र Manual/9(3)2016/Settlement of claim/21003 Dated 13/12/2017 जारी केलेला आहे.
भविष्य निधी कायद्या अंतर्गत कोणताही दावा (online/offline) करतांना ज्या बँकेचे खाते आपण आपल्या भविष्य निधी खात्यास जोडलेले आहे (KYC) त्या खात्याचा आपले नाव निर्देशित केलेल्या चेकची स्कॅन प्रत (कॉपी) जोडावी किवा जर चेक उपलब्ध नसेल तर त्या खात्याच्या पास बुकची सत्यप्रत आपल्या आस्थापनेने ( मालकाने ) किवा बँक यवस्थापकाने साक्षांकित प्रत जोडणे (UPLOAD) करणे बंधनकारक आहे.
जर वरील प्रमाणे आपण पूर्तता केलेली असेल तर आपला दावा (CLAIM) मंजूर होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही व दावा परत येणे, रद्द करणे या पासून आपली सुटका होईल व कार्यालयीन कामातही सुसूत्रता येईल व वेळ वाचेल असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी केले आहे.