विशेष प्रतिनिधी, मुंबई
नोकरदार वर्गासाठी भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण सेवानिवृत्तीनंतर या रकमेचा आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो. इतकेच नव्हे तर नोकरी करत असताना आपत्कालीन परिस्थितीत देखील पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढता येते. भविष्य निर्वाह निधीची रक्कम किती जमा झाली हे आपण आता बघू शकता. भविष्य निधी खात्यात पैसे आले आहेत की नाही हे आपण सहज शोधू शकता. यासाठी, ईपीएफओ, पीएफ खात्याचे व्यवस्थापन करणारी संस्था योग्य सुविधा देते, ईपीएफओ वेबसाईटद्वारे आपण पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता. याशिवाय, उमंग अॅपद्वारे आपण पीएफ खात्याची शिल्लक देखील शोधू शकता. दोन्ही प्रकारे आपली शिल्लक कशी तपासू शकता हे जाणून घेऊ या…
ईपीएफओ वेबसाइटवरून
– पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाईन तपासण्यासाठी प्रथम तुम्हाला EPFO वेबसाइट epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला EPFO पोर्टलमध्ये ‘Our Services’ च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि ‘For Employees’ चा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज (पान ) उघडेल, तिथे तुम्हाला पासबुकच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक आणखी नवीन पान उघडेल. तेथे तुम्ही तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून तुमच्या पासबुकमध्ये पीएफ खात्याची शिल्लक तपासू शकता.
– तथापि, या प्रक्रियेसाठी, वापरकर्त्यांसाठी सक्रिय UAN असणे आणि PF खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
– आपण एम-ईपीएफ किंवा उमंग अॅपद्वारे आपले पीएफ खाते शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी आधी तुमच्या मोबाईलवर अॅप इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अॅपच्या मेंबर ऑप्शनवर जावे लागेल.
– त्यानंतर तेथे तुम्हाला शिल्लक किंवा पासबुकचा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला तुमचा यूएएन आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुमचा पीएफ बॅलन्स दाखवला जाईल.
– पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी मिस्ड कॉल सेवा आणि एसएमएस सेवा देखील उपलब्ध आहेत. परंतु काही वेळा त्या ग्राहकांना उपलब्ध असलेल्या दिसत नाहीत.