इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील ठिकाणी, येथे सिगारेटसारख्या वस्तू वापरणे योग्य होणार नाही, असा इशारा फलकावर लिहिलेला असल्याचे अनेकदा दिसून येते. तसेच पेट्रोल पंपावर कधीही सिगरेट ओढू नका, असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. एक लहानशी ठिणगी सुद्धा पुर्ण पेट्रोल पंप उडवू शकते. मात्र तरी देखील काही मंडळी ऐकत नाहीत. आणि नियमांचं उल्लंघन करतात. पण एखाद्या वेळेस त्यांच्यासोबत भंयकर घटना घडते. आता हा व्हायरल होणारा व्हिडीओच पाहा. एक व्यक्ती गाडीत पेट्रोल भरत असताना सिगरेट ओढत होता. पण या सिगरेटमुळे उलट त्याची गाडीच पेटली. १० रुपयांच्या सिगरेटने लाखो रुपयांची गाडी जाळली. आता तो पेट्रोल पंपावरच काय घरातसुद्धा सिंगरेटला हात लावणार नाही.
अशा प्रकारची पेट्रोल पंपाजवळ वाहनांना आगी लागण्याच्या घटना वारंवार होऊनही अनेकजण आपली सवय सोडत नाहीत आणि त्यांना नुकसान सोसावं लागतं. अशी एक सदर घटना ही रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरातील घटली आहे. यात एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे भयंकर दुर्घटना घडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कारचालकाने एक छोटीशी चूक केली आणि कारने पेट घेतला. पेट्रोलपंपावर घडलेली ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
https://twitter.com/nexta_tv/status/1553285559782674439?s=20&t=lb8MDQTC0EklrAv8FK6RFg
या व्हिडीओत पाहूत शकता पेट्रोल पंपावर एक कार उभी आहे. कारमध्ये पेट्रोल भरलं जात आहे. कारचा मालका कारला टेकूनच कारबाहेर उभा आहे. तो खिशातून काहीतरी काढतो आणि त्याचवेळी त्याची कार पेट घेते. कारला आग लागते आणि पेट्रोलपंपवरील मशीनलाही. त्यानंतर ती व्यक्ती घाबरते आणि घाईघाईत फ्यूल पंपचं हँडल आपल्या गाडीतून काढून फेकते. तेव्हा आगीचा आणखी भडका उडतो. ती व्यक्ती गाडीत बसते आणि कार घेऊन तिथून पळून जाते. गाडीच्या मागच्या बाजूने पेट घेतल्याचं दिसतं. त्यानंतर तिथं असलेले सर्व लोक घाबरतात. सर्वजण आपाआपल्या गाड्या घेऊन तिथून निघून जातात.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. यात पुढे तत्काळ ज्वाळा दिसत आहेत. त्या व्यक्तीने पटकन पेट्रोल पंपाचे हँडल गाडीतून बाहेर फेकले. सुदैवाने आग काही वेळातच विझली. कारण, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने अग्निशमन यंत्र उचलून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.
Petrol Pump Cigarette Fire Blast Car Viral Video