सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पेट्रोल पंपावर फसवेगिरी; भेसळीचा प्रकार तरुणाने असा केला उघड

by Gautam Sancheti
डिसेंबर 25, 2021 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

लखनऊ (उत्तर प्रदेश) – पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाचे दर आधीच वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत असून त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच पेट्रोलमध्ये भेसळ करण्यात येत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि भेसळ ही जणू काही समीकरणच बनले आहे. देशामधील सर्वात राज्यात या संदर्भात वाहन चालकांनी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. परंतु उत्तर प्रदेशमध्ये या भेसळीने कळस गाठला आहे. अशीच एक घटना आग्रा शहरानजीक घडली, येथील पेट्रोल मध्ये चक्क पाणी होते. परंतु एका तरुणाच्या सतर्क भक्तीमुळे पेट्रोल पंपावरील भेसळीचे पितळ उघडे पडले

प्रतापपुरा येथील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर वाहन बंद पडल्याने वाहनचालकांनी गोंधळ घातला. कारण पेट्रोलमध्ये पाणी आले. या प्रकरणाचे पाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापूर्वी दुसऱ्या पंपावरील बिघाडाच्या तपासणीत मीटरमध्ये बिघाड आढळून आला होता. नामनेर येथील रहिवासी असलेल्या एका ग्राहकाने प्रतापपुरा येथील एचपी पंपावरून मोटरसायकलमध्ये ५०० रुपये किमतीचे पेट्रोल भरले. त्यानंतर दुचाकी सुरू झाली नाही.

पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याचे समजले. ग्राहकाने पंपावर तक्रार केली. इतरही जमले. बादली आणि बाटलीत पेट्रोल भरल्यानंतर त्यात पाणी मिसळल्याचे आढळून आले. लोकांनी गोंधळ घातला तेव्हा माहिती मिळताच रकाबगंज पोलीस ठाणे पोहोचले. पोलिसांनी लोकांना समजावून सांगून प्रकरण शांत केले. या गोंधळाचे पाच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव सिंह यांचे म्हणणे आहे की, पंपाच्या विक्रीचे रेकॉर्ड आणि वेळेत मीटरमध्ये तफावत आढळून आली आहे. अहवाल एडीएमकडे पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी पंपाचे मालक करण दुग्गल यांचे म्हणणे आहे की, तपासणीदरम्यान त्यांच्या पंपात कोणताही दोष आढळला नाही.

चार वर्षांपूर्वी 24 पंपांवर कारवाई करण्यात आली होती.सन 2017 मध्ये लखनौमध्ये चिप टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पेट्रोल पंपांवर तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घाटौलीतील पंपांवर गुन्हे दाखल केले होते. तीन पंपही सील करण्यात आले. दोन वर्षांनी ते पुन्हा उघडण्यात आले. सध्या आग्रा शहरामध्ये 215 पेट्रोल पंप आहेत. पंपांची तपासणी व तपासणीसाठी तीन विभागांची पथके तयार करण्यात येत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑनलाईन पेमेंट करताय? ही खबरदारी घ्या..

Next Post

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बर्फाळ समुद्रात तब्बल १२ तास पोहत त्याने वाचवला स्वतःचा जीव

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
Next Post
FHTzNTEVUB4RfMi

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बर्फाळ समुद्रात तब्बल १२ तास पोहत त्याने वाचवला स्वतःचा जीव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011