नाशिक – ३१ मे रोजी पेट्रोलियम कंपनीचे व शासनाचे मनमानी कारभारा विरुद्ध तसेच पेट्रोलियम डीलरचे मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे खरेदी बंद आंदोलन देशव्यापी सर्व डीलरने पुकारले असून त्यात महाराष्ट्रातील फामपेडा या राज्यव्यापी संघटनेचे ६५०० पेट्रोल पंप चालक सभासद असून नाशिक जिल्हा सदर संघटनेशी संलग्न असल्याने नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनने खरेदी बंद आंदोलनात सहभाग घेणार असल्याची माहिती नाशिक डिट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी पेट्रोलपंपधारकांच्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली.
– २०१७ पासून कोणतेही डीलर कमिशन मध्ये तेल कंपनी व सरकारने वाढ केलेली नाही ती वाढ आजचे भांडवल व खर्च याप्रमाणात अपूर्व चंद्र कमिटीचे सूचनेप्रमाणे तातडीने आढावा घेऊन वाढ करण्यात यावी.
– ४ नोव्हेंबर २०२१ व २१ मे २०२२ रोजी केंद्र सरकारने डीलरचा विचार न करता अबकारी कर कमी करून सुमारे १० ते ८ रुपये प्रतिलिटर दिलासा सर्वसामान्य जनतेला दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु ते करताना डीलरचे भांडवली होणाऱ्या नुकसानाची कोणतेही तरतूद शासनाने केली नाही. त्यामुळे देशभरातील सर्व डीलर चे सुमारे ३००० कोटीचे नुकसान झाले आहे.
– सध्या राज्यभर तसेच विशेष नाशिक मध्ये भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनी कडून त्यांचा भांडवली तोटा होत असल्याने अल्प प्रमाणात इंधनाचा पुरवठा डीलरला होत असून त्यामुळे डीलरला सामान्य जनतेच्या रोष पत्करावा लागत आहे.
अध्यक्षांचे डिलरला आवाहन
या सर्व मागण्या करीता सर्वांनी ३१ मे २०२२ रोजी खरेदी बंद या लक्षवेधी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष भोसले यांनी सर्व डीलर बांधवांना केले आहे. ते पुढे म्हणाले की, उद्या सकाळी ठीक ८ वाजे पासून दिवस भर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन डेपो, पानेवाडी, मनमाड,नाशिक येथे मोठ्या संख्येने डिलरने उपस्थित राहून निषेध नोंदवायचा आहे. तरी आपल्या न्याय हक्कासाठी एकजुटीने सर्वांनी सकाळी मनमाड येथे नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव औरंगाबाद येथील सर्व डीलर बांधवांनी यायचे असल्याचेही भोसले यांनी म्हटले आहे.