मुंबई – पेट्रोल-डिझेलचे भाव गेल्या पाच दिवसात आज चौथ्यांदा डिझेलचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षभरात गगनाला भिडले असून काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलचे दर जीएसटी अंतर्गत आणण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर निम्म्याने कमी होतील चर्चा सुरू होती. परंतु प्रत्यक्षात काही घडले नाही, याउलट पेट्रोल डिझेलचे दर दिवसागणिक वाढत असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईत पेट्रोल 107.47 रुपये आणि डिझेल 97.21 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.
गेल्या पाच दिवसात आज चौथ्यांदा डिझेलचे दर वाढले आहेत. अडीच महिन्यांनंतर मंगळवार, दि. 28 सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या किंमतीतही वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी थेट डिझेल 25 पैशांनी वाढवले आहे, तर पेट्रोल 20 ते 22 पैशांनी महाग झाले आहे. आता या दर वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 101.39 रुपये आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल 107.47 रुपये आणि डिझेल 97.21 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये देखील पेट्रोलचे दराने शंभरी पार केली असून याचा दळणवळणावर मोठा परिणाम झाला असून महागाई आणखीनच वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल 101.87 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल 92.62 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 99.15 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल 104.92 आणि डिझेल 95.06 प्रति लीटरवर पोहोचले आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोल 109.85 रुपये प्रति लीटर आणि एक लिटर डिझेल 98.45 रुपये दराने विकले जात आहे. इंधनाच्या सातत्याच्या दरवाढीमुळे केंद्र सरकार विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण होत असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वास्तविक, परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.
एसएमएसद्वारे तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या, तुमच्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMS द्वारे तपासू शकता. इंडियन ऑईल (IOC) चे ग्राहक RSP <डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर पाठवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी <डीलर कोड> पाठवू शकतात.