नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईने पोळलेल्या सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक वार्ता आहे. ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. गेल्या ७ महिन्यातील निचांकी स्तरावर भाव पोहोचले आहेत. त्यामुळे ऐन दसरा-दिवाळीतच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची घोषणा केली जाणार आहे.
ब्रेंट क्रूड ऑइल ९२ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव घसरले असले तरी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मात्र स्थिर आहेत. आता या घडामोडींमुळे देशातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. २१ मे रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशभरात पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपये प्रति लिटर स्वस्त झाले होते.
गेल्या सहा महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. परंतु, आगामी दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होईल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यास वाढलेली महागाई देखील कमी होईल. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकतो. तेलाचा सर्वात मोठा आयातदार चीनमध्ये कोरोनाची वाढते प्रमाण, जागतिक मंदीची वाढती भीती आणि इंधनाची कमी मागणी यामुळे क्रूडच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. ही घसरण यापुढेही कायम राहू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होऊ शकते.
अलीकडेच आशिया पॅसिफिकच्या संदर्भात एक अहवाल जारी केला असून या अहवालात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊ शकते.
सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेल २ ते ३ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. सध्या कच्चे तेल ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल ८५ डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. हा दर रशिया-युक्रेन युद्धापूर्वीचा आहे. २३ जानेवारी रोजी क्रूड ९० डॉलरच्या खाली होते. त्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर भाव वाढू लागले. फेब्रुवारीमध्ये क्रूडने प्रति बॅरल ११० डॉलर पार केले होते.
केंद्र सरकारने सुमारे ३ महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. या बदलत्या परिस्थितीचा सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होईल. सध्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.
एसएमएसद्वारे (SMS) आपण पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP टाईप करुन ९२२४९९२२४९ या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन ९२२३११२२२२ क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो ९२२२२०११२२ या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.
Petrol Diesel Prices Will Reduce Soon
Crude Oil Fuel Festival Season