इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पेट्रोलपंपावरून पेट्रोल खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पेट्रोलपंपावर मापात पाप करण्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस येतात. पेट्रोलपंपचालक हातचालाखी करून ग्राहकांची फसवणूक करतात. यावर आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहेच, शिवाय इतक काही गोष्टी करता येऊ शकतात.
पेट्रोलचोरी असो अथवा पंपावर सुविधांची वानवा असो, याबद्दल तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहेत. पेट्रोलपंपावर तुम्हाला कमी पेट्रोल मिळत आहे असे जर वाटत असेल, तत्काळ पंपचालकाकडून पाच लिटर मोजून घ्या. या मोजमापावर वजन माप विभागाचा शिक्का मारला जातो.
पेट्रोलपंपचालकाने नकार दिला तर, तिथे नोंदवलेल्या नोंदणीकृत क्षेत्र व्यवस्थापकास फोन करा. तिथे फोन आणि मेल आयडी नमूद केलेला असतो. पेट्रोलमध्ये भेसळ आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तत्काळ फिल्टर पेपर चाचणी करू शकता.
जर तुम्ही पेट्रोल भरत असाल तर आपला मोबाईल क्रमांकासह प्रति ७५ रुपये मिळणारा एक अतिरिक्त पॉईंट नोंदवा. तुमच्या वाढदिवसानिमित्त कंपनी १०० पॉईंट भेट म्हणून देते. एका पॉईंटचे मूल्य ३० पैसे असते. नंतर त्याची तुमच्या बिलातून घट होईल.
इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक संजीव कक्कड सांगतात, त्यांचे सर्व पंप स्वयंचलित आहेत. फसवणुकीची शक्यता जवळपास नसल्यातच आहे. इंधन घेतल्यानंतर जी प्रमाण किंमत असते त्यापेक्षा कमी दिले जाऊ शकत नाही.