मुंबई – केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी झाले. त्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवसाच्या निर्णयाअगोदर देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये १२३.४६ रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर होते. त्याच वेळी, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज ९६.६७ रुपये प्रति लिटर तर मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०४.७७ रुपये दराने विकले जात होते. आता मात्र केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळे या दरात घट होणार आहे.
केंद्र शासनाने #पेट्रोल आणि #डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (#VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. pic.twitter.com/2BtoUW0Ooi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 22, 2022