हरसूल : पेठ तालुक्यातील देवीचामाळ येथील अजय मनोहर चौधरी (वय १३ ) इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी मित्रांसोबत गावाशेजारील नदीवर दुपारी ४ वाजेच्या सुमारास आंघोळीसाठी गेला असता नदीच्या पाण्यात बुडाला. उन्हाचे तापमान वाढल्याने ग्रामीण भागातील मुले दुपारच्या सुमारास नदीवर पोहण्यासाठी जात असतात. त्याचप्रमाणे अजय चौधरी हा सुद्धा आपल्या मित्रांसोबत गावाजवळील नदीवर पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाला. त्यामुळे उन्हात पोहण्यास जाणे त्याच्या जीवावर बेतले. जिल्हा परिषद शाळा नाचलोंढी येथील आठवीच्या वर्गात शिकत असलेला अजय मनोहर चौधरी हा दुपारच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गावाशेजारील नदीवर आंघोळीसाठी गेला होता. नदीच्या काठावरील खडकावर उडी मारताना खडकावर पडून जखमी अवस्थेत नदीत बुडाल्याची माहिती सोबत असलेल्या इतर मित्रांनी देवीचामाळ ग्रामस्थ व नातेवाईकांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी नदीत अजय चौधरी याचा शोध घेण्याचा पर्यन्त केला. बुडालेल्या ठिकाणी हरसुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी भेट देऊन बुडालेल्या अजयला शोधण्यासाठी गावातील तरुणांची मदत घेतली. परंतु रात्री उशिरा पर्यंत यश आले नाही. मयत अजय चौधरी हा देवीचामाळ जवळील नाचलोंढी येथे जिल्हा परिषद शाळेत शिकत होता तर त्याचे वडील मनोहर निवृत्ती चौधरी व आई सखुबाई चौधरी हे रोजगारासाठी शिर्डी येथे स्थलांतरित आहे. आपली आजी विमल निवृत्ती चौधरी हिच्यासोबत देवीचामाळ येथे राहात होता.