पेठ – नाशिक विभागातील पेठ आगारातील एसटी बस चालक गहीनीनाथ अंबादास गायकवाड (२८) रा.मानावळी ता. आष्टी जि.बीड यांनी (आज दि.१९) रोजी पेठ येथील सुलभा नगर येथे भाड्याने राहत असलेल्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यभर सुरू असलेला एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाच्या संपामुळे व आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत सुरु असलेल्या संपाने एसटी महामंडळातील कर्मचारी यांच्या समोर उभे राहीलेले आर्थिक संकट यातुन अने कर्मचारी आत्महत्या सारखे नको ते विचार करुन आत्महत्या करित असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. यातुन कमी पगार व आर्थिक विवचंनेतुन गहीनीनाथ गायकवाड या पेठ आगारातील एसटी चालाकाने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. गायकवाड हे गेली सात ते आठ वर्षा पासून पेठ आगारात नोकरी करीत असून सुलभा नगर येथे भाड्याच्या खोलीत पत्नी आपल्या तीन लहानशा मुलींसोबत राहत होते. त्यांच्या अशा अकस्मिक निधनाने पेठ आगारातील कर्मचारी व अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे.