पेठ – पेठ तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात वनविकास महामंडळाच्या रात्रीच्या गस्ती पथकाने रात्रीच्या सुमारास सुमारे विरमाळ ते कळंमबारी या कक्ष क्रमांक ८५ दरम्यान रस्त्याने जात असलेल्या झायलो वाहन क्रमांक एम एच ०४ ई एफ ५७८२ या वाहनास संशयीत रित्या जात असता ते थांबवुन वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी वाहन चालकास विचारपुस केली असता उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने संशय बळावल्याने वाहनाची तपासणी करत असता वाहन चालक व त्याचे साथीदार वाहन सोडुन अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे. सदरील वाहनात सागाचे चार तुकडे केलेले ०.०५ घन.मीटर लाकुड मिळुन आले वाहनासह दोन लाख चार हजार तेरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील साग तस्कर हे ब-याच दिवसांपासुन वनविभागाला गुंगारा देत असल्याचे वनविभाच्या अधिका- यां कडुन सांगण्यात येते.सदरील कारवाई प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक प्रदेश पी टी मोरणकर विभागिय व्यवस्थापक ठाकुर मॅडम सहाय्यक व्यवस्थापक कातोरे मॅडम यांचे मार्गदर्शना खाली आंबे वनक्षेत्रपाल एच बी राऊत फिरते पथक वनक्षेत्रपाल के एल भांगरे वनपाल डी एम शिवदे सी जे चौरे वनरक्षक एम जी वाघ के एस बोरस हेमंत भोयेे आदी या कामगिरीत सहभागी होते.