नाशिक – भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग बोर्डचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी एमआयडीसीमधील अनागोंदी, भूखंड घोटाळा, ओल्ड फॅकेड बिल्डिंग यावर ताशेरे ओढले आहे. तर महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळातील क्लोजर नोटीससह इतर विषयांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या विषयावरील दोन व्हिडिओ क्लीप सुध्दा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहे. यात त्यांनी अंत्यत गंभीर गोष्टी सांगितल्या. त्यामुळे या दोन्ही व्हिडिओच्या क्लीप सध्या चर्चेत आहे.