काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर असंख्य नागरिक आपापल्या मायदेशी परतण्यासाठी आतूर झाले आहेत. १३४ जणांची क्षमता असलेल्या विमानात तब्बल ८०० प्रवासी बसल्याचा धक्कादायक फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. त्यातच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात स्पष्ट दिसते आहे की, नागरिक स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आणि अफगाणिस्तानातून सुटका मिळविण्यासाठी चक्क विमानाच्या पंखांवर बसले आहेत. याच पंखावर बसलेल्या एका नागरिकाने हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून तो आता सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. यातूनच काबूल आणि अफगाणिस्तानातील अत्यंत दयनीय स्थिती समोर येत आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/Joyce_Karam/status/1427215225661579264
https://twitter.com/wisal_Pti/status/1427701890813505545