मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर निवृत्तीवेतन धारक असाल आणि तुम्हाला हयातीचा दाखला देण्याची चिंता असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचे वृत्त आहे. घरबसल्या तुम्ही स्मार्टफोनद्वारे हयातीचे प्रमाणपत्र तयार करु शकता आणि ते पाठवूही शकता. ही सुविधा नेमकी कशी आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे., 1 ऑक्टोबर 2022 पासून 57,000 हून अधिक निवृत्ती वेतनधारकांनी (57,13,609) त्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर केली आहेत, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये स्मार्टफोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचे (चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान) लोकार्पण केले होते. त्या तंत्रज्ञानालाही लोकप्रियता मिळत आहे.
सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स असोसिएशन, पेन्शन वितरण बँका, केंद्रीय मंत्रालय/विभाग आणि केंद शासन आरोग्य सेवा- सीजीएचस वेलनेस सेंटर यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन’ तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
निवृत्तीवेतनधारकांमध्ये जीवन प्रमाणपत्रे डिजिटली सादर करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आज अंबरनाथ येथे एक दिवसीय मोहीम आयोजित केली. 180 हून अधिक पेन्शनधारकांनी चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले. निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये फेस ऑथेंटिकेशन जीवन प्रमाण अॅप कसे डाउनलोड करावे आणि त्यांच्या फोनवरून जीवन प्रमाणपत्र कसे द्यावे याबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. लाइफ सर्टिफिकेट 60 सेकंदात तयार केले जाते आणि मोबाईल फोनवर एक लिंक पाठवली जाते जिथून ते डाउनलोड केले जाऊ शकते.
यापूर्वी जीवन प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना तासंतास बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता, एका बटणाच्या क्लिकसरशी हे शक्य झाले आहे, असे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचे अवर सचिव मनोज कुमार यांनी स्पष्ट केले.
मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण अधिका-यांमार्फत देखील उपलब्ध आहे. केंद्र शासनाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल मोडद्वारे सादर करण्यासाठी संबंधित केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला बँका, पेन्शनर्स असोसिएशन, Meity/राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) आणि युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) चे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांचा सहभाग मोलाचा होता. केंद्रीय पथकाने सर्व पेन्शनधारकांना विभागाच्या अधिकृत यू ट्यूब चॅनेलला भेट देण्याची विनंती केली: DOPPW_INDIA OFFICIAL.यावर चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सांगणारे व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत. चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोव्हेंबरचा पूर्ण महिना ही मोहीम राबविली जाणार आहे.
https://youtu.be/XF4bbPa_XHg
Pension Holder Life Certificate From Home Facility Video
Digital Life Certificate Face Authentication