मनमाड ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पानेवाडी शिवारातील इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पात असलेल्या एका मोरांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वीज पुरवठा खंडीत झाला होता. तातडीने वीज कर्मचारी गायकवाड यांनी तो सुरळीत केला. या घटनेची माहिती मिळताच नांदगांव वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत मृत मोरांला ताब्यात घेतले. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी तीन मोरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी वन्यप्रेमींसह नागरिकांनी केली आहे.