अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या पावसाचे वातावरण आहे,आकाशात ढग दाटून आले की मोर पिसारा फुलवत नाचू लागतात,मनमाड जवळच्या कातरवाडी शिवारात मोठ्या संख्येने मोर आढळून येतात. सध्या या परिसरात चांगला पाऊस झाल्याने वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणावर कमी झाला असल्याने अनेक वन्यजीव सर्वत्र फिरत असतात, असाच संध्याकाळच्या वातावरणात शेतकरी भगवान झाल्टे यांच्या शेतात मोर आपला पिसारा फुलवून नाचत असतानाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी पाठवला आहे.