मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची डिजिटल पेमेण्ट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालक वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज घोषणा केली की, ते ९ जून ते १९ जून २०२२ पर्यंत खेळवण्यात येणाऱ्या आगामी पेटीएम भारत वि. दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेदरम्यान यूपीआय पैसे ट्रान्सफरवर उत्साहवर्धक ‘४ का १०० कॅशबॅक ऑफर’ पुन्हा घेऊन येत आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत-वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान ऑफर पहिल्यांदा सादर करण्यात आली तेव्हा लाखो युजर्सना १०० रूपयांची कॅशबॅक मिळाली होती.
ऑनलाइन पैस ट्रान्सफर करण्यासाठी लाखो युजर्स पेटीएम यूपीआयला पसंती देतात, जे सुरक्षित व विश्वसनीय आहे. सामन्यांच्या दिवशी, नवीन युजर्स ‘४ का १०० कॅशबॅक ऑफर’चा लाभ घेऊ शकतात, जेथे पेटीएम यूपीआयचा वापर करत ४ रूपये पाठवल्यानंतर त्यांना १०० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल.
नवीन युजर्स गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून पेटीएम अॅप डाऊनलोड करत पेटीएम यूपीआयसाठी साइन अप करू शकतात. पेटीएम अॅपमध्ये ते काही मिनिटांमध्येच पेटीएम यूपीआय सेवांचा वापर करत नोंदणी करू शकतात आणि त्यांची बँक खाती लिंक करू शकतात. ही सेवा त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामधून विनासायास व सुरक्षितपणे ऑनलाइन पेमेण्ट्स करण्याची सुविधा देते. तसेच ही सेवा त्यांना लिंक केलेल्या खात्यामधील शिल्लक रक्कम मोफतपणे त्वरित तपासण्याची आणि कोणतेही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करत पेमेण्ट्स करण्याची सुविधा देखील देते. याव्यतिरिक्त विद्यामन युजर्स रेफरल उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास १०० रूपये कॅशबॅक जिंकू शकतात, जेथे ते मित्र किंवा कुटुंबियांना यूपीआय पैसे ट्रान्सफरसाठी पेटीएमचा वापर करण्यास आमंत्रित करतात.
पेटीएम प्रवक्ता म्हणाले, “पेटीएम यूपीआयसह युजर्सना सुपरफास्ट व सुरक्षित पैसे ट्रान्सफरची सुविधा मिळते. लाखो युजर्सना कॅशबॅक्स मिळालेल्या आमच्या ‘४ का १०० यूपीआय ऑफर’च्या यशासह आम्ही अधिकाधिक लोकांना डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आगामी टी२० मालिकेदरम्यान ही मोहिम पुन्हा आणली आहे.” कंपनी युजर्सना पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डस् आणि पेटीएम पोस्टपेड यांसारख्या पेमेंट साधनांची व्यापक श्रेणी देते.