सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तिस-या तिमाहीत पेटीएमचा महसूल ८९ टक्‍क्‍यांनी वाढून १,४५६ कोटींवर

मर्चंट पेमेण्‍ट्समध्‍ये वाढ, नवीन डिवाईस सबस्क्रिप्‍शन्‍स आणि कर्ज वितरणांमुळे महसूलामध्‍ये वाढ

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 5, 2022 | 8:21 pm
in राष्ट्रीय
0
Paytm Logo

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची डिजिटल पेमेण्‍ट्स व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची मालक वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने त्‍यांच्‍या आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमधील निष्‍पत्ती सांगितल्‍या आहेत. ऑक्‍टोबर-डिसेंबर या तिमाहीदरम्‍यान कंपनीचा महसूल वार्षिक ८९ टक्‍क्‍यांनी वाढून १,४५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए नुकसान (ईएसओपी खर्चापूर्वी) ३९३ कोटी रूपयांपर्यंत कमी झाले, मागील वर्षातील याच तिमाहीदरम्‍यान हे नुकसान ४८८ कोटी रूपये होते. उच्‍च उत्‍पन्‍न व एमडीआर बीअरिंग इन्‍स्‍ट्रूमेंट्सच्‍या माध्‍यमातून मर्चंट पेमेण्‍ट्समध्‍ये वाढ, नवीन डिवाईस सबस्क्रिप्‍शन्‍स आणि कर्ज वितरणांमुळे महसूलामध्‍ये ही वाढ झाली. कंपनीने सरासरी ६४.४ मंथली ट्रान्‍झॅक्टिंग युजर्सचा सक्रिय सहभाग आणि २.५ लाख कोटी रूपयांच्या जीएमव्‍हीची देखील नोंद केली.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले, ”आमचा व्‍यवसाय ग्राहक, व्‍यापा-यांना पेमेण्‍ट्स सुविधा देण्‍यासोबत क्रॉस-सेल उच्‍च-मार्जिन आर्थिक सेवा व व्‍यापार देण्‍याचा आहे. आम्‍ही ग्राहकांना आमच्‍या कन्‍झ्युमर अॅपवर बिल पेमेण्‍ट्स, मनी ट्रान्‍सफर व ऑफलाइन मर्चंट पेमेण्‍ट्स सुविधा देण्‍यासोबत पेटीएम पेमेण्‍ट इन्‍स्‍ट्रूमेंट्स (पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेण्‍ट्स बँक अकाऊंट व पेटीएम पोस्‍टपेड) आणि पेटीएम यूपीआय सुविधा देखील देतो. आम्‍ही व्‍यापा-यांना क्‍यूआर पेमेण्‍ट्स, ईडीसी व साऊंडबॉक्‍स डिवाईसेस आणि पेमेण्‍ट गेटवे (ऑनलाइन व्‍यापा-यांसाठी) सुविधा देतो. आम्‍ही आमच्‍या व्‍यासपीठावरील माहितीचा वापर करत आमचे ग्राहक आणि व्‍यापा-यांना विविध आर्थिक उत्‍पादने देतो. आम्‍ही आमच्‍या व्‍यापा-यांना पेटीएम अॅपचा वापर करत व्‍यापार करण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍यास उच्‍च-मार्जिन कॉमर्स व क्‍लाऊड सर्विसेस देखील देतो.”

ग्राहकांना पेटीएम सेवा देण्‍यामधून कंपनीचा महसूल ६० टक्‍क्‍यांनी वाढून ४०६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, तर व्‍यापा-यांना पेटीएम सेवा देण्‍यामधून महसूल ११७ टक्‍क्‍यांनी वाढून ५८६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. क्‍लाऊड व कॉमर्स सेवांमधून देखील महसूल ६४ टक्‍क्‍यांनी वाढून ३३९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. कंपनीच्‍या तिस-या तिमाहीमधील निष्‍पत्तींचा बहुतांश भाग वाढलेल्‍या आर्थिक सेवांमधून दिसून आला. कंपनीने ४.४ दशलक्ष कर्जांचे वितरण केले (वार्षिक ४०१ टक्‍क्‍यांची वाढ), ज्‍याचे एकूण मूल्‍य २,१८१ कोटी रूपये होते (वार्षिक ३६६ टक्‍क्‍यांची वाढ).

कंपनीचा क्रेडिट व्‍यवसाय तीन प्रमुख क्षेत्रांमध्‍ये विस्‍तारलेला आहे – पेटीएम पोस्‍टपेड (बाय नाऊ, पे लॅटर), मर्चंट लोन्‍स आणि वैयक्तिक कर्ज. या तिन्‍ही क्षेत्रांमध्‍ये झपाट्याने वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये पोस्‍टपेड लोन्‍सचे वितरण वार्षिक ४०७ टक्‍क्‍यांनी वाढले, तर पोस्‍टपेड लोन्‍सचे मूल्‍य वार्षिक ४०८ टक्‍क्‍यांनी वाढले. आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये वितरित करण्‍यात आलेली वैयक्तिक कर्जे वार्षिक १,१८७ टक्‍क्‍यांनी वाढली, तर वैयक्तिक कर्जांचे मूल्‍य वार्षिक १,९२५ टक्‍क्‍यांनी वाढले. क्रॉस-सेलमध्‍ये लक्षणीय क्षमता दिसण्‍यात आली, जेथे आमच्‍या विद्यमान पेटीएम पोस्‍टपेड युजर्सना ५० टक्‍क्‍यांहून अधिक वैयक्तिक कर्जे देण्‍यात आली. सरासरी कर्ज मूल्‍य ८०,००० रू. ते ९०,००० रूपये होते, तर सरासरी मुदत १२ ते १४ महिने होती.

तसेच आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीमध्‍ये वितरित करण्‍यात आलेले मर्चंट लोन्‍स वार्षिक ३८ टक्‍क्‍यांनी वाढले, तर मर्चंट लोन्‍सचे मूल्‍य वार्षिक १२८ टक्‍क्‍यांनी वाढले. २५ टक्‍क्‍यांहून अधिक कर्जे नवीन कर्जदात्‍यांना देण्‍यात आली. सरासरी कर्ज मूल्‍य वाढत गेले, जे आता १२०,००० रू. ते १४०,००० रूपये आहे, तर सरासरी मुदत १२ ते १४ महिने होती. वारंवार कर्ज घेण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे, जेथे २५ टक्‍के व्‍यापा-यांनी एकाहून अधिक वेळा कर्ज घेतले आहे. आर्थिक वर्ष २०२१ व आर्थिक वर्ष २०२२ दरम्‍यान कंपनीच्‍या योगदान नफ्यामध्‍ये लक्षणीय बदल दिसण्‍यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्‍या तिस-या तिमाहीसाठी योगदान नफा वार्षिक ५६० टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ४५४ कोटी रूपये राहिला. कंपनीचा खर्च देखील महसूलाच्‍या टक्‍केवारीशी तुलना करत लक्षणीयरित्‍या कमी होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ गावांच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
carona

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011