रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता मराठी भाषेत मिळणार पेमेंट अलर्ट्स… पेटीएम साऊंडबॉक्‍सची सुविधा…

by India Darpan
ऑगस्ट 23, 2023 | 5:31 am
in राष्ट्रीय
0
Paytm Soundbox

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत इन-स्‍टोअर पेमेंट्समधील लीडर म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे. पेटीएमचे साऊंडबॉक्‍स नाविन्‍यपूर्ण ऑडिओ डिवाईस आहे, जे व्‍यापाऱ्यांना पेटीएम क्‍यूआरच्‍या माध्‍यमातून मिळालेल्‍या प्रत्‍येक पेमेंटसाठी वॉईस नोटिफिकेशन्‍ससह मदत करते. दरम्यान पेटीएमने व्यापा-यांकरिता मराठी भाषेत पेमेंट अलर्ट्स मिळण्‍याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सध्‍या डिवाईसमध्‍ये मराठीसह १० भाषा उपलब्ध आहेत ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्‍नड, मल्‍याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओडिया या भाषांचा समावेश आहे. हे डिवाईस व्‍यापाऱ्यांना पेमेंट्सवर देखरेख ठेवण्‍यास आणि चुकीचे व्‍यवहार व ग्राहकांकडून होऊ शकणाऱ्या फसवणूकीला प्रतिबंध करण्‍यास मदत करते.

इन-स्‍टोअर पेमेंट्समधील आपले नेतृत्‍व अधिक दृढ करत पेटीएमने नुकतेच व्‍यापाऱ्यांसाठी दोन नवीन डिवाईसेस – पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स आणि पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स लाँच केले, ज्‍यामधून लहान दुकानांसाठी तंत्रज्ञानाचे नेतृत्‍व केले आहे. मेड इन इंडिया पेटीएम ऑल-इन-वन पॉकेट साऊंडबॉक्‍स नेहमी व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांसाठी अनोखा डिवाईस आहे. आणखी एक स्‍वदेशी डिवाईस पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स व्‍यवसायाला मनोरंजनाची जोड देतो.

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑर्डर करावा
 पेटीएम फॉर बिझनेस अॅप उघडा आणि साऊंडबॉक्‍स विभागामध्‍ये जा.
 नवीन डिवाईस पर्यायाचा शोध घ्‍या आणि त्‍यावर क्लिक करा.
 विनंती अर्ज भरा आणि योग्‍य उत्‍पादन व्‍हर्जनसाठी ऑर्डर करा.
 साऊंडबॉक्‍स तुम्‍हाला घरपोच डिलिव्‍हर केला जाईल.

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑपरेट करावा
 डिवाईसच्‍या डाव्‍या बाजूवरील रबरी हॅच खुला करत बॉक्‍ससह मिळालेले सिम इन्‍सर्ट करा.
 लाइट इंडिकेटर लाल व निळे करण्‍यासाठी पॉवर बटन प्रेस करून ठेवा.
 डिवाईस पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासाठी कार्यान्वित होईल.
 मदतीसाठी सोबत दिलेल्‍या मॅन्‍युअलमधील अॅक्टिवेशनबाबतच्‍या सूचनांचे पालन करा.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘मेक इन इंडिया’ दृष्टीकोनाला पुढे घेऊन जात पेटीएमचा साऊंडबॉक्‍स १०० टक्‍के स्‍वदेशी उत्‍पादित करण्‍यात आलेले उत्‍पादन आहे. पेटीएमच्‍या पेमेंट सोल्‍यूशन्‍ससह साऊंडबॉक्‍सच्‍या व्‍यापक अवलंबतेने पेटीएमला भारतातील मोबाइल पेमेंट्सशी संलग्‍न केले आहे.

Paytm Payment Sound box Marathi Alerts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनपा शाळेच्या शिक्षकाचा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार… पालकांनी दिला चोप…

Next Post

चांद्रयानच्या लँडिंगबाबत राज्याच्या विविध भागात विशेष कार्यक्रमांचे आयोजन… बघा, कुठे काय होणार?

India Darpan

Next Post
F39wQAIaAAAkFDz

चांद्रयानच्या लँडिंगबाबत राज्याच्या विविध भागात विशेष कार्यक्रमांचे आयोजन... बघा, कुठे काय होणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011