शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पेटीएम मनीची डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मुदतवाढ

केवायसी अपडेटची आणि डिमॅट खाते खोलण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली

जुलै 14, 2022 | 5:15 am
in राज्य
0
Paytm Logo

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेटीएम मनी लिमिटेडने (पीएमएल) आपल्या डायरेक्ट म्युच्युअल फंड युजर्ससाठी त्यांचे केवायसी अपडेट करण्याची आणि डिमॅट खाते खोलण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. या कंपनीने देशातील सर्वात मोठा एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफ प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफसोबत त्यांच्या स्टॉक ब्रोकिंग कोडअंतर्गत डायरेक्ट म्युच्युअल फंड्स प्रस्तुत करण्यासाठी एकीकरण केले आहे.

याआधी पेटीएम मनी लिमिटेड सेबीच्या नियमांनुसार एका आरआयए कोडअंतर्गत त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट म्युच्युअल फंड एक्झिक्युशन व अड्वायजरी सेवा देत होती. एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्या अड्वायजरी सेवा खंडित करण्यात आल्यानंतर आता पेटीएम मनीने जुलै २०२२ पासून स्टॉक ब्रोकिंग कोड वापरून डायरेक्ट म्युच्युअल फंड्ससाठी फक्त एक्झिक्युशन सेवा देण्याचे ठरवले आहे.

बीएसई स्टारवर आरआयए कोड ते स्टॉकब्रोकर कोड अशा तंत्रज्ञान बॅकएन्ड शिफ्टसाठी एक युसीसी (युनिक क्लायंट कोड) निर्माण करणे आवश्यक असते आणि सेबीच्या युसीसी नियमांनुसार युजर्सचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे.

पेटीएम मनी आणि बीएसई स्टार एकीकरणामुळे युजर्सना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये काहीही बदल होणार नाही. पेटीएम मनी ऍपच्या सर्व वैशिष्ट्यांचा आणि सेवांचा लाभ ते सतत मिळवत राहू शकतील.

डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणूकदार या अतिशय सहजसोप्या टप्प्यांचे पालन करून त्यांची खाती अपडेट करू शकतील. ही सर्व कार्यवाही १००% डिजिटल करता येण्याजोगी आहे.

१. तुमच्या सहीचा सुस्पष्ट फोटो सबमिट करा.
२. केवायसीचा एक भाग म्हणून पेटीएम मनी ऍपवर एक लाईव्ह फोटो क्लिक करा.
३. निःशुल्क डिमॅट खाते सुरु करण्यासाठी ई-साइन पूर्ण करा.

बीएसई स्टारसोबत एकीकरणानंतर ऍपमार्फत डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भात रिटेल गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

१. पेटीएम मनी हे भारतामध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंडांचे आघाडीचे वितरक आहेत.
२. स्टेटमेंट ऑफ अकाउंट फॉर्ममध्ये (एसओए) असलेली युनिट्स कायम राहतील. ती युनिट्स डिमॅट खात्यामध्ये हलवली जाणार नाहीत.

३. इक्विटीमध्ये गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय जोवर गुंतवणूकदार घेत नाहीत आणि जोवर डिमॅट खाते हे फक्त डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीच वापरले जात आहे तोवर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे डिमॅट खाते इक्विटी गुंतवणुकीसाठी वापरणार असल्यास इक्विटी टॅरीफ्स लागू होतील.

४. सध्याचे एसआयपी आता जसे आहेत तसे, कोणतेही बदल न करता प्रोसेस केले जातील, आणि गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक ऍपमध्ये पाहू शकतील.
५. गुंतवणूकदारांना त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओला रिडीम करण्याची किंवा त्याबाबत काहीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही आणि हे एकीकरण संपूर्णपणे बीएसई स्टार व पेटीएम मनी टीममार्फत हाताळले जाईल.

६. सध्याचे जे गुंतवणूकदार पेटीएम मनी डिमॅट खात्यामार्फत इक्विटीजमध्ये आधीपासून गुंतवणूक करत आहेत त्यांना कोणतीही कार्यवाही करण्याची गरज नाही कारण त्यांचा युसीसी आधीच तयार करण्यात आला आहे आणि तोच युसीसी डायरेक्ट म्युच्युअल गुंतवणुकींसाठी वापरता येईल.

 

पेटीएम मनी लिमिटेडचे सीईओ श्री. वरुण श्रीधर म्हणाले, “आम्ही भारतामध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंड्सची सुरुवात अगदी सोप्या, खर्च शून्य असलेल्या व पारदर्शक पद्धतीने केली आणि आता आम्ही एक नवा आकर्षक डायरेक्ट म्युच्युअल फंड अनुभव सादर करण्यासाठी सज्ज आहोत. बीएसई स्टारसोबत बॅकएन्ड तंत्रज्ञान एकीकरणामुळे आमच्या रिटेल गुंतवणूकदारांना अनेक वेगवेगळे लाभ मिळतील आणि नियामक आवश्यकतांनुसार गुंतवणूकदारांना डिमॅट खाते सुरु करणे व आमच्या प्लॅटफॉर्मवर एक युसीसी तयार करणे गरजेचे आहे. फक्त डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली जात असल्यास डिमॅट खाते संपूर्ण आयुष्यभर निःशुल्क राहील. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांप्रती वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या गुंतवणूक वाटचालीचा आदर करतो. त्यांचे बचत नियोजन आणि एसआयपी आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच त्यांना तीन महिने वाढवून देण्यात आले आहेत, अगदी सहजसोपे टप्पे पूर्ण करण्यासाठी त्यांना हा वेळ पुरेसा ठरेल.”

Paytm Money Direct Mutual Fund Investors

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे देवा! सौंदर्यासाठी तिने केल्या तब्बल ४० शस्त्रक्रिया; आता चेहऱ्याची झाली अशी अवस्था

Next Post

ओटीपी उशीरा दिला म्हणून कॅब चालकाने थेट प्रवाशाची केली हत्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

ओटीपी उशीरा दिला म्हणून कॅब चालकाने थेट प्रवाशाची केली हत्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011