मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेटीएम या प्रसिद्ध डिजिटल पेमेंट कंपनीने मोबाईल रिचार्जवर अधिभार लावला आहे. रिचार्ज शुल्काच्या आधारावर हा अधिभार १ रुपया ते ८ रुपयांदरम्यान लावला जाणार आहे. सर्व पेटीएम मोबाईल रिचार्जवर अधिभार शुल्क लागू होणार आहे. पेटीएम वॉलेट बँलेंस, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) किंवा क्रेडिट-डेबिट कार्डसारख्या कोणत्याही पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज केला, तर अधिभार शुल्क द्यावा लागणार आहे.
तथापि सध्या ही सुविधा सर्व युजर्सना उपलब्ध नाही. गेल्या वर्षी पेटीएमचा सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी फोन पे नेसुद्धा मोबाईल रिचार्जवर अधिभार शुल्क लावण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ट्विटरवर उपलब्ध युजर्सच्या अहवालांनुसार, पेटीएमने मार्च महिन्याच्या अखेरीस काही युजर्सकडून अधिभार शुल्क घेण्यास सुरुवात केली होती. परंतु युजर्सच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, शुल्कामध्ये अचानक वाढ झाल्यानंतर लक्षात आले आहे की आता मोठ्या प्रमाणात युजर्सना अधिभार लागू झाला आहे.
तथापि अजूनही सर्व पेटीएम युजर्सना अधिभार लागू झालेला नाही. नवे अतिरिक्त शुल्क किंवा अधिभार फक्त १०० रुपयांहून अधिक व्यवहारावर लागू होणार आहे. ज्या निवडक युजर्सना अपडेटचा भाग म्हणून मानले गेले त्यांना कमाल ६ रुपयांपर्यंत अतिरिक्त पेमेंट करावे लागणार आहे. कोणत्याही कार्ड, यूपीआय आणि वॉलेट आदीचा वापर करण्यावर किंवा ग्राहकांच्या सुविधेवर शुल्क घेतले जाणार नाही. असे स्पष्टीकरण २०१९ मध्ये काही अफवा दूर करण्यासाठी पेटीएमने ट्विटरच्या माध्यमातून दिले होते.