मुंबई – पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची (IPO) तारीख जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीचा आयपीओ दि. 8 नोव्हेंबरला उघडेल. त्यामुळे आता किरकोळ गुंतवणूकदार दि. 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान कधीही IPO साठी बोली लावू शकतात.
१) पेटीएमचा आयपीओ दि. 18 नोव्हेंबर रोजी, कंपनी BSE आणि NSE वर सूचीबद्ध होईल. तसेच आयपीओचे वाटप लिस्टिंग करण्यापूर्वी केले जाईल. याचा अर्थ 18 नोव्हेंबरपूर्वी गुंतवणूकदारांना समजेल की, त्यांना आयपीओ मिळाला आहे की नाही. त्याचबरोबर शेअर बाजारात कंपनीची लिस्टिंग झाल्यानंतर आयपीओवर सट्टेबाजी करणाऱ्या गुंतवणूकदारांना किती नफा किंवा तोटा झाला हेही पाहता येईल.
२) आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी सामान्य जनतेला देते, तेव्हा ही प्रक्रिया आयपीओद्वारेच पूर्ण होते. आयपीओ लाँच आणि शेअर्सचे वाटप झाल्यानंतर कंपनीची लिस्टिंग केली जाते. साधारणपणे कोणत्याही कंपनीच्या आयपीओची सुरुवातीची किंमत कमी असते. तथापि, शेअर बाजारात लिस्टिंग केल्यानंतर, त्याच्या शेअरच्या किमती बाजारानुसार वाढत किंवा कमी होत राहतात.
३) आयपीओच्या दृष्टीकोनातून 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. कारण यावर्षी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहेत. येत्या काही दिवसात सुमारे 70 कंपन्या त्यांचा IPO लाँच करणार आहेत. आपल्या कंपनीत गुंतवणूकदारांसाठी काही कालावधीसाठी आयपीओ खुली ठेवते. साधारणपणे हा कालावधी 3 ते 10 दिवसांचा असतो. या दरम्यान, गुंतवणूकदार कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नोंदणीकृत दलालीद्वारे त्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतो. IPO उघडण्याच्या समाप्तीनंतर, कंपनी शेअर्स वाटप करते आणि त्यानंतर ते शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होतात.
४) काही तज्ज्ञांच्या मते, पेटीएम त्याच्या आगामी IPO साठी 2,080 ते Rs 2,150 चा प्राइस बँड निश्चित करू शकते. दरम्यान, अशीही बातमी आहे की पेटीएम आपल्या IPO चा आकार 18,300 कोटी रुपयांपर्यंत वाढवेल. कारण आता या कंपनीची सर्वात मोठी शेअरहोल्डर अलीबाबा ग्रुप फर्म अँट फायनान्शियल आणि सॉफ्टबँकसह इतर विद्यमान गुंतवणूकदारांनी पेटीएममधील त्यांचे बहुसंख्य हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने लक्ष्य साध्य केल्यास ते देशातील सर्वात यशस्वी आयपीओ मानले जाईल. भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO कोल इंडिया (CIL) चा आहे, कारण त्यांनी 2010 मध्ये 15,475 कोटी रुपये उभारले होते.