मुंबई – शेअर बाजारात पेटीएमचा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ अतिसामान्य लिस्टिंगमध्ये ठेवल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जबाबदारी घेण्यावरून सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाले आहेत. काहींचे मत आहे की, या नुकसानीला कोटक-महिंद्रा बँक जबाबदार आहे. यासंदर्भातील पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. मात्र, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, कोटक-महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक यांनी यात स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
पेटीएमचा आयपीओ सध्या विशेष चर्चेत आहे. आयपीओ येण्यापासून, गुंतवणूक आणि त्यानंतर गडगडणारे दर यामुळेही. गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. याचसंदर्भात ट्विटरवर एका युजरने पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, या नुकसानीला कोटक महिंद्रा बँक जबाबदार असल्याचे म्हटले. त्यावर काही युजर्सनी बँकेचे प्रमुख उदय कोटक यांना टॅग करून नुकसानीच्या भरपाईची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर उदय कोटक यांचे प्रत्युत्तर आले आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) उदय कोटक यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. ते लिहितात, कोटक महिंद्रा बँक आयपीओच्या लीडमध्ये मॅनेजर नव्हती. युजरला प्रत्युत्तर देताना ते सांगतात, कृपया तुमचे तथ्य व्यवस्थित पडताळून पाहा. कोटक महिंद्रा बँक Zomato IPO आणि Nykaa IPO ची लीड मॅनेजर होती. कोटक बँकेने झोमॅटोचे इश्यू प्राइज ७६ (सध्याचे बाजार मूल्य १५०), नायकाचे इश्यू प्राइज ११२५ (सध्याचे बाजार मूल्य २१००) वर मॅनेज केले होते. कोटक यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर संबंधित युजरने माफी मागितली.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारात मंगळवारी पेटीएमच्या शेअरचा भाव १४९४.९५ रुपयांवर बंद झाला. सोमवारच्या तुलनेत या शेअरने ९.९० टक्क्यांनी उसळी घेतली आहे. शेअर बाजारात गुरुवारी पेटीएमची नकारात्मक लिस्टिंग झाली होती. या दोन दिवसात पेटीएमचे शेअर मूल्य ४० टक्क्यांहून अधिक खाली गेले आहे.
https://twitter.com/udaykotak/status/1462712595295744002