मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमचे मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्सने आज डीटीएच रिचार्जवर उत्साहवर्धक दैनंदिन लकी ड्रॉ स्पर्धेची घोषणा केली, जेथे दररोज एका भाग्यवान विजेत्याला सुरू असलेल्या आयपीएल हंगामादरम्यान ५,००० रूपयांची कॅशबॅक मिळण्याची संधी आहे.
युजर्स पेटीएम अॅपच्या माध्यमातून टाटा स्काय, एअरटेल टीव्ही, डीश टीव्ही, डी२एच व सन डायरेक्टसह सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर्सच्या रिचार्जवर ‘डेली डीटीएच धमाल’ लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतील. कोणतीही किमान ऑर्डर मूल्य नसल्यामुळे पेटीएम अॅपच्या माध्यमातून डीटीएच रिचार्ज करणारे युजर्स लकी ड्रॉमध्ये सहभाग घेण्यास पात्र ठरतील. भाग्यवान विजेत्यांच्या नावांची घोषणा दररोज करण्यात येईल.
पेटीएमवर डीटीएच अकाऊंट्स रिचार्ज करणे सुलभ आहे आणि ग्राहकांना २-स्टेप इन्स्टण्ट रिचार्ज व वेळेवर प्लान संपण्याबाबत रिमाइंडर्स अशा वैशिष्यांसह सुलभ पेमेंट अनुभव देते. पेटीएम युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल), डेबिट व क्रेडिट कार्ड्स किंवा नेटबँकिंग अशा त्यांच्या पसंतीच्या पेमेंट मोडमधून निवड करण्याची देखील सुविधा देते.
पेटीएम प्रवक्ता म्हणाले, “लाखो युजर्स त्यांचे डीटीएच अकाऊंट्स रिचार्ज करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात आणि सुरू असलेल्या आयपीएल हंगामासह आम्हाला युजर्सना डेअली डीटीएच धमाल लकी ड्रॉसह अधिक उत्साहाची भर करण्याचा आनंद होत आहे. सुलभ २-स्टेप इन्स्टण्ट रिचार्जसह आम्ही युजर्सना त्यांच्या सोयीसुविधेनुसार विविध पेमेंट पर्याय देखील देतो.”
पेटीएम अॅपचा वापर करत युजर्स वीज बिल, गॅस सिलिंडर बुकिंग, मेट्रो कार्ड, मोबाइल, ब्रॉडबॅण्ड व डीटीएच, केबल टीव्ही, भाड्याचे पेमेंट्स, क्रेडिट कार्ड बिल्स अशा विविध विभागांमध्ये बिल पेमेंट्स व रिचार्ज करू शकतात. ते एलआयसी/ विमा हप्ता पेमेंट, लोन पेमेंट्स अशा इतर आर्थिक सेवांसाठी देखील देय भरू शकतात.