मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकी धारण करणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) आज आज घोषणा केली की, त्यांच्या अॅपवरील व्हॅक्सिन फाइण्डर टूलवर आता सरकारी नियमनांनुसार पात्र सर्व नागरिकांना बूस्टर डोससाठी नोंदणी करता येऊ शकते.
पेटीएमच्या अॅपवरील व्हॅक्सिन फाइण्डर टूल भारतभरातील युजर्सना सुलभपणे जवळचे हॉस्पिटल्स व लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध कोविड लसीची माहिती देते आणि त्यांच्या पसंतीनुसार स्लॉट्स बुक करण्याची सुविधा देते. पेटीएम हेल्थ विभागामध्ये युजर्स ‘बुक कोविड व्हॅक्सिन’ निवडत आणि बूस्टर डोसची निवड करत बूस्टर डोससाठी नोंदणी करू शकतात. त्यानंतर युजर्स तारीख निवडून ‘बुक नाऊ’वर क्लिक करू शकतात. युजर्स त्यांच्या स्वत:साठी किंवा लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या लाभार्थीसाठी बूस्टर डोस बुक करू शकतात.
पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “आम्हाला पेटीएम अॅपवरील व्हॅक्सिन फाइण्डर टूलच्या समावेशनासह कोविड-१९साठी सर्वात मोठ्या लसीकरण उपक्रमामध्ये भूमिका बजावण्याचा अभिमान वाटतो. हे टूल आता युजर्सना बूस्टर डोस बुक करण्याची सुविधा देईल. यामधून लसीकरणामध्ये वाढ करण्याला चालना देण्याप्रती आणि भारतीयांना आरोग्यदायी व सुरक्षित राहण्यामध्ये मदत करण्याप्रती कंपनीची अविरत कटिबद्धता दिसून येते.”
कोविड-१९ लसीकरणासाठी नोंदणी करण्याव्यतिरिक्त पेटीएम प्रत्येक लस घेतलेल्या व्यक्तीला काही सेकंदांमध्येच सुलभपणे लस प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सेवा देते. युजर्सना इंटरनॅशनल ट्रॅव्हल व्हॅक्सिन सर्टिफिकेट्स देखील उपलब्ध होऊ शकतात, जे त्यांना देशाबाहेर प्रवास करताना साह्यभूत ठरतील.
पेटीएमने नागरिकांना अॅपच्या माध्यमातून अनेक आरोग्यसेवा एकसंधी उपलब्ध करून देत सक्षम केले आहे, जसे हेल्थ आयडीची निर्मिती, लस प्रमाणपत्र डाऊनलोड करणे, रक्तपेढ्यांशी संबंधित माहिती शोधणे, औषधांची खरेदी, ऑनलाइन डॉक्टर कन्सल्टेशन्सचे बुकिंग, लॅब टेस्ट्स आणि आरोग्य व कोविड-संबंधित विमा घेणे.