मुंबई – तुमच्या मोबाईलमधील पेटीएम अॅपद्वारे तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करू शकता याची माहिती तुम्हाला आहे का? हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीचे अॅप किंवा वेबसाईटवर जाण्याची गरज नाही. आश्चर्य वाटेल, मात्र खरेच पेटीएमने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात तात्काळ बुकींगचे ऑप्शनही आता उपलब्ध आहे.
एसीचे तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी सकाळी १०ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर नॉन एसी अर्थात स्लीपरसाठी सकाळी ११ वाजता वेळ सुरू होतो. शिवाय तात्काळ तिकीट कन्फर्म मिळाल्यानंतर कॅन्सल केले तर त्याचे एकही रुपयाचे रिफंड मिळत नाही, हे देखील ध्यानात ठेवावे लागेल. हे बुकींग कसे करायेच हे आपण आज जाणून घेणार आहोत…..
-
Paytm वरून बुकींग करण्यासाठी पहिले लॉगइन करावे लागेल.
-
तात्काळ तिकीटांचे बुकींग सुरू झाल्यानंतर अर्धा तासाने Paytm वरून तात्काळ तिकीट बुक करण्याचे ऑप्शन उपलब्ध होईल.
-
अर्थात ११ वाजता स्लीपरचे बुकींग सुरू झाले तर Paytm वर ते ११.३० वाजता दिसायला लागेल.
-
Paytm अॅप सुरू केल्यावर त्यातील ट्रॅव्हल या पर्यायावर क्लिक करा
-
त्यानंतर डेस्टीनेशन, ट्रॅव्हल आणि डेट सिलेक्ट करा
-
त्यानंतर ज्या गाडीने जायचे आहे ती गाडी सिलेक्ट करा
-
कोटा आप्शनमध्ये जाऊन तात्काळचा पर्याय निवडा आणि बुक वर क्लिक करा
-
त्यानंतर खासगी माहिती भरावी लागेल आणि बर्थ सिलेक्ट करावा लागेल
-
पुढे पेमेंटसाठी तुम्हाला हवा तो पर्याय निवडावा लागेल
-
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिकीट बुक झालेले असेल