इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या काळात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून या अधिवेशनात नेमके कोणते विषय चर्चत येतात व विरोधक कोणत्या विषयांवरुन सरकारला घेरतात हे महत्त्वाचे आहे.
या पावसाळी अधिवेशान शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतक-यांची कर्जमाफी या विषयांवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेऊ शकतात. तर सरकारतर्फे कोणते विधेयक या अधिवेशनात येतात व त्यावर विरोधक काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २९ जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होईल. या चहापानाचा कार्यक्रमावर विरोधक नेहमीप्रमाणे बहिष्कार घालण्याची शक्यता जास्त आहे.