सिडको (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नवीन नाशिक पत्रकार संघातर्फे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांना एक लाखाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यात पत्रकार भूषण पुरस्कार इंडिया दर्पणचे पत्रकार सुदर्शन सारडा यांच्यासह विविध दैनिकांच्या पत्रकारांना देण्यात येणार आहे. रविवार २६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा. हा पुरस्कार सोहळा द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स हॉल, सिंचन भवन समोर, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, उंटवाडी रोड, येथे होणार आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात पत्रकार भूषण पुरस्कार चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) प्रशांत कोतकर (दै. सकाळ), संजय शहाणे (दै. लोकमत), साई प्रसाद पाटील (दै.दिव्य मराठी), प्रवीण बिडवे (दै. मटा ), गौरव अहिरे (दै. पुढारी), वसंत आव्हाड (दै. पुण्यनगरी), फारुख पठाण (दै. देशदूत), अश्विनी पांडे (दै. गावकरी), मुकुंद बाविस्कर (भ्रमर), कमलाकर तिवडे (दै. नवराष्ट्र ), प्रशांत किरवे (दै. महानगर), मदन बोरसे (दै. नवभारत), प्रताप जाधव (दै. प्रहार ), दिनेश जाधव ( दै. लोकनामा), अजय भोसले (लक्ष महाराष्ट्र ), सुदर्शन सारडा (इंडिया दर्पण), विजकुमार इंगळे ( दै. सकाळ), दीपक भावसार (दै. महासागर) आदींना गौरविण्यात येणार आहे.
तर समाजभूषण पुरस्कार शिक्षण संस्थाचालक स्मिता चौधरी, डॉ. एस. एस. सोनवणे, सौंदर्य तज्ञ. डॉ. चंचल साबळे, डॉ. सत्यजित महाजन,डॉ. नितीन फरगडे, विधी तज्ञ अँड. राहुल कासलीवाल, ॲड. हिमिका शहा, ॲड. धिरज हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, मनोहर कारंडे व रामदास शेळके, माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, , माजी नगरसेवक भागवत आरोटे, निसर्ग प्रेमी गोकुळ पाटील सामाजिक कार्यकर्ते बंडूशेठ दळवी, उद्योजक संदीप मांडवडे, उपसरपंच सदानंद नवले, पोलीस अधिकारी छाया देवरे, कविराज वाणी, गोरक्ष पुरुषोत्तम आव्हाड, दिव्याग प्रेमी बाळासाहेब घुगे आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. गिरीश महाजन, खा. राजाभाऊ वाजे, आ. सीमा हिरे, माजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ऊबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, वंचित महानगर प्रमुख अविनाश शिंदे, भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी पत्रकारांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने कऱण्यात आले आहे.
शोध पत्रकार पुरस्कार : सुदर्शन सारडा
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिेता क्षेत्रात असून सुरवातीला गांवकरी तरुण नंतर लोकमत, तर सकाळ मध्ये बातमीदार म्हणून काम केले आहे. २०२० साली जिल्हा पत्रकार संघाचा तर २०२२ साली नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवस्थानच्या वतीने उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त.
कांदाप्रश्न घेऊन शोध पत्रकारितेच्या माध्यमातून बागवानी केंद्राची पोलखोल सुदर्शन सारडा यांनी केली. या वृत्त मालिकेचा मोठा impact देश पातळीवर झाला. नाफेड आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाने दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. सुदर्शन सारडा इंडिया दर्पणचे विशेष प्रतिनिधी आहे.