मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. राऊतांनी या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरले असल्याची माहिती समोर आली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला याविषयी माहिती दिली आहे. संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. या सिनेमात राऊतांनी बेहिशोबी पैसे वापरले. एप्रिल २०२१मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावादेखील पाटकर यांच्याकडून करण्यात आला आहे.
जानेवारी २०१५ मध्ये मराठी सिनेमा बाळकडू रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा कोणत्याही लाभाशिवाय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आल्याचे म्हणले होते. मात्र या सिनेमाने ६० लाख रुपये निव्वळ नफा कमवला. त्यापैकी राऊतांनी ५० लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले. त्यांच्या नावाने धनादेश काढला. या सिनेमासाठी संजय राऊतांचं कोणतेही योगदान नव्हते. त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून ५० लाख रुपये घेतले असा आरोपदेखील स्वप्ना पाटकर यांनी ईडीशी बोलताना केला आहे. पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असं ईडीच्या तपासात समोर आले आहे.
Patra Chawl Scam Ed Shivsena MP Sanjay Raut
Money Laundering
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD