इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या अफवा अनेकदा पसरवल्या जातात, किंवा निनावी फोन करुन तशी माहिती दिली जाते. विमानात बॉम्ब असल्याची घटना अनेकदा सांगण्यात येते मात्र बहुतांश वेळा ती अफवाच असते. पाटणा विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका प्रवाशाने बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर विमानात असलेल्या सर्व प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
याबाबत तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देऊन विमान उतरवण्यात आले. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी विमानाची पाहणी केली. पण विमानात काहीच सापडले नाही. उतरवलेले विमान आज सकाळी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगो फ्लाइट (क्रमांक 6E2126 ) टेक ऑफ करत असताना ऋषीचंद सिंग नावाच्या प्रवाशाने दावा केला की, त्यांच्याकडे बॉम्ब आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांमध्ये मोठी खळबळ मिळाली आणि घबराट झाली त्यानंतर उड्डाण रद्द करून संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी ऋषीचंद सिंग याला ताब्यात घेतले आहे. चौकशी केली आहे.
विमानात बॉम्ब असल्याची अफवा एका व्यक्तीने पसरवली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण विमानाची तपासणी केली. असा कोणताही प्रकार आढळला नाही. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने विमानतळ पोलिस सतर्क झाले. याबरोबरच बॉम्ब शोधक व नाशक पथके, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने तेथे पोचल्या होत्या.
बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली. फ्लाइटमध्ये काहीही सापडले नसले, तरी खबरदारी म्हणून फ्लाइट रद्द करून सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा प्रवासी ऋषीचंद सिंग हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा विमानतळ पोलिसांनी दावा केला आहे. शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही कारणाने विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगच्या घटना समोर येत आहेत. मागील गुरुवारीच एअर इंडियाचे विमान AI 934 (दुबई-कोची) उड्डाण दरम्यान खराब हवामानामुळे मुंबईकडे वळवण्यात आले आहे. विमानाने मुंबईत सुरक्षित लँडिंग केले. 21 जुलै रोजी एअर इंडियाच्या बोईंग फ्लीट एअरक्राफ्ट प्रकार B787 ला काही समस्या आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर फ्लाइट वळवण्यात आली आणि मुंबईला लँडिंग करण्यात आले. अशा घटना वारंवार घडत असल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडत आहे.
Patna Airport Midnight Bomb Rumer Dog Squad Checking Indigo Flight