इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक वर्षांनी किंग खान मोठ्या पडद्यावर परततो आहे. चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. पण, त्याचा येऊ घातलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. याला कारण आहे ते चित्रपटातील एक गाणे, आणि त्या गाण्यातील दीपिकाच्या कपड्यांचा रंग. शाहरुख खान आणि त्याचा येऊ घातलेला चित्रपट ‘पठाण’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील एका गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद पेटला आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. काही लोकांनी तर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काही प्रमाणात लोक शाहरुखच्या बाजूने उभे आहेत.
गाण्यावरून उठलेल्या वादळानंतर शाहरुखने कोलकाता चित्रपट महोत्सवात हजेरी लावली तेव्हा त्याने या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतला. नुकतंच शाहरुखने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. #AskSRK हा हॅशटॅग वापरुन त्याने त्याच्या चाहत्यांच्या तसेच प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शाहरुखच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी या वादाच्या अनुषंगाने त्याला प्रश्न विचारले. त्यापैकी बऱ्याच लोकांना शाहरुखने त्याच्या नेहमीच्या खास शैलीत उत्तरं दिली. एका चाहत्याने ‘पठाण’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं आहे.
हा चाहता म्हणतो, “माझं लग्न २५ जानेवारीला आहे, तर ‘पठाण’ २६ जानेवारीला प्रदर्शित झाला तर बरं होईल.” यावर शाहरुख म्हणाला, “तुम्ही लग्न २६ जानेवारीला करा, त्यादिवशी सुट्टीपण आहे.” ‘पठाण’च्या प्रमोशनमध्येच सध्या शाहरुख आणि त्याची टीम व्यस्त आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चार वर्षांनी शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकारही आहेत.
https://twitter.com/iamsrk/status/1604103111013908481?s=20&t=bM-i7VzwAoA747li2v4FzQ
Pathan Movie Release Date Postponed Actor Shahrukh Khan Says
Bollywood Film Controversy