नवी दिल्ली – वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज एका कार्यक्रमात विजेत्यांना राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार 2020 प्रदान केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना गोयल म्हणाले की, यांनी खालील महत्वाच्या कामगिरीचा उल्लेख केला. 2013-14 मधील 4,227 पेटंट्सना मान्यता दिल्याच्या तुलनेत 2020-21 मध्ये 28,391 पेटंटला मान्यता दिली असून ही वाढ 572 टक्के इतकी आहे. पेटंट परीक्षणासाठी असलेला वेळ डिसेंबर 2016 मध्ये असलेल्या 72 महिन्यांपासून डिसेंबर 2020 मध्ये 12-24 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली. तर 75 वर्षांदरम्यानच्या (1940-2015) 11 लाखांच्या तुलनेत 4 वर्षांमध्ये (2016-2020) 14.2 लाख ट्रेडमार्कची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, आपण 2020 मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताची क्रमवारी सुधारली असून या क्रमवारीत भारताचे स्थान 48 वर आणले आहे. (2015-16 मधील 81 व्या क्रमांकावरून 33 स्थानांनी झेप) मंत्री म्हणाले, आता आपण सर्वांनी जागतिक नवोन्मेष निर्देशांकात अव्वल 25 देशांमध्ये स्थान मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे. भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले की, मोटारीपासून संगणकापर्यंत आणि शिवणकामाच्या यंत्रांपासून ते अंतराळ यानापर्यंत, आपण सर्वांना मानवतेच्या चांगल्या भविष्याची रचना करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ते म्हणाले की आपल्या बौद्धिक संपदेच्या कार्यक्षेत्राला अधिक निष्णात बनवण्यासाठी आपण सर्वांनी नव कल्पनांचे योगदान देणे आवश्यक आहे.