बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पतंग उडवत असाल तर महावितरणच्या या सूचनांकडे लक्ष द्या….

by India Darpan
जानेवारी 8, 2025 | 12:55 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250108 WA0153

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मकरसक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढतांना एका तारेवर दुस-या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांकीत अपघात होवून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवू शकतो. प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाच मांजा वापरुचं नये.

नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वादळ वारा व पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात.त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता तसेच संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा तसेच महावितरणच्या २४/७ सुरु असणा-या कॉल सेंटरचे १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

३ हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

नाशिकला अन्न व औषध प्रशासनाची दोन गुटखा विक्रेत्यावर धाड, लाखोंचा गुटखा जप्त

Next Post
IMG 20250108 WA0173 e1736322399829

नाशिकला अन्न व औषध प्रशासनाची दोन गुटखा विक्रेत्यावर धाड, लाखोंचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011