नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. २८ सप्टेंबर २०२२ पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे पीसीसी अपॉइंटमेंटसाठीची तारीख लवकर मिळेल. या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठीही मदत होईल. गोवा पारपत्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
Passport Police Clearance Certificate Post Office