इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रयागराज विमानतळावरील सुरक्षेतील मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका हॉटेल मालकाने जेवणासोबत काटेरी चमचा घेऊन तो चक्क विमानात बसला. विमानाने उड्डाण केल्यानंतर ही बाब उघड झाली. त्यानंतर एकच घबराट पसरली. दिल्लीला जाणारे विमान पुन्हा प्रयागराजमध्ये उतरवण्यात आले. पुन्हा तपासणी केल्यानंतर विमान दिल्लीला रवाना करण्यात आले. सुरक्षेतील मोठी त्रुटी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरू केला आहे.
इंडिगोचे विमान सोमवारी दुपारी १२.३५ वाजता प्रयागराजच्या रहिमाबाद येथील बमरौली प्रवासी विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. विमानाने उड्डाण घेऊन थोडाच वेळ झाला होता. त्याचदरम्यान, प्रयागराज सिव्हिल लाइन्समध्ये असलेल्या रविशा हॉटेलच्या मालकाने घरून अन्न आणि काटेरी चमचा सोबत आणल्याची माहिती समोर आली. विमानात बंदी असतानाही बाहेरचे जेवण आणि काटेरी चमचे पाहून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
हा प्रकार वैमानिकाला कळताच त्यालाही धक्का बसला. त्याने ताबडतोब विमान प्रयागराजकडे वळविले. वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) बोलल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. यानंतर त्या प्रवाशाकडील काटेरी चमच्या बाहेर काढून घेण्यात आला. तसेच सर्व प्रवाशांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर विमान पुन्हा रवाना करण्यात आले.
Passenger Boarded Plane with Fork Spoon Flight Return