इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही प्रवास मग तो कार, बस, अगदी जहाज किंवा विमान अथवा अन्य साधनांचा असो त्यामध्ये धोका हा असतोच, विशेषतः विमान प्रवास हा जितका जलद गतीने आणि सुखकर मानला जातो, तितकाच धोकादायक देखील असतो. कारण हवेत आपला जीव हा अंतरी तरंगत असतो, असे म्हटले जाते.
गेल्या काही दिवसात जगभरातील अनेक देशांमध्ये विमान अपघाताच्या घटना घडत आहेत. चीन मध्ये देखील विमानात बिघाड झाल्याने अपघात होऊन त्यात अनेक प्रवासी जखमी झाले चीनमधील चोंगकिंग येथे गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. येथे तिबेट एअरलाइन्सच्या विमानाने विमानतळावर टेकऑफ दरम्यान धावपट्टी ओलांडली.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान चोंगकिंगहून तिबेटमधील ल्हासाला जाणार होते. मात्र, धावपट्टीवरून उतरल्यानंतर विमान थांबले तोपर्यंत त्यात आग लागली होती. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सदर विमानात 113 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. अपघात होताच मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमान आगीत जळताना दिसत आहे. मात्र, या घटनेच्या इतर काही फोटोंमध्ये अग्निशमन दलाचे जवानही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवताना दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, उड्डाण करण्यापूर्वीच विमानातील कर्मचार्यांना विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय होता. यानंतर घाईघाईने टेकऑफ थांबवण्यात आले. यादरम्यान विमानाने टेक ऑफ न करता धावपट्टी ओलांडली आणि आग लागूनही दुर्घटना घडली.
बघा अपघाताचा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/FATIIIAviation/status/1524558060773068802?s=20&t=jnjUjVsxGWrHLqCf7Rn7Jw