बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे ३१ मार्च पर्यंत इको ग्लॅम्पिंग महोत्सव…६० टेंट उभारण्यात आले

by Gautam Sancheti
जानेवारी 27, 2025 | 12:59 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 01 25 at 211507 1 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत नाशिक येथे गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे आयोजित ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.

यावेळी पर्यटन संचालनालय, मुंबई चे संचालक बी. एन. पाटील, पर्यटन संचालनालय, नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक परिसरातील पर्यटन स्टेकहोल्डर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक चे अध्यक्ष व सदस्य, भोसला मिलिटरी स्कूल चे विद्यार्थी व पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पर्यटक उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी येथे उभारण्यात आलेल्या टेंटची व स्टॉलची पाहणी केली.

गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे २५ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. जेथे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी लक्झरी कॅम्पिंग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये एकूण ६० टेंट उभारण्यात आले आहेत. तसेच विविध वस्तू विक्रीसाठी बचत गट इत्यादी यांना छोटे २० स्टॉल्स टेंट उपलब्ध करून दिले आहेत. सदर महोत्सवामध्ये उभारलेले टेंट पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व साहसी उपक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांमध्ये Wine Experience Center, हस्तकला व खाद्य पदार्थ प्रदर्शन व विक्री, ग्रामीण जीवन शैली चे अनुभव, जमीन, हवा आणि पाणी या संबंधित साहसी उपक्रम, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे.

साहसी पर्यटन उपक्रमांमध्ये महोत्सवात पॅरा सेलिंग, पॅरा मोटरिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डुओ सायकलिंग, ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) आणि पेंटबॉल अरेना यासारख्या रोमांचक ॲक्टीव्हिटीजचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि फोटोग्राफी, निसर्गोपचार, बायोडायनामिक शेती, आदिवासी कला आणि संस्कृती आणि इको-मरीन एक्सप्लोरेशनवरील कार्यशाळा यांचा देखील अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटकांनी नाशिक मधील लक्झरी कॅम्पिंग व विविध साहसी क्रिडा प्रकारांचा सांस्कृतिक उपक्रमांसमवेत अनुभव घेणेसाठी नक्की या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे…अजित पवार यांचे विधान चर्चेत

Next Post

राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल १००० कोटीचा फटका…रोहित पवार यांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Next Post
rohit pawar

राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल १००० कोटीचा फटका…रोहित पवार यांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011