इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरूच आहे. माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या संपत्तीचाही शोध घेतला जात आहे. ईडीची कारवाई ‘नोटांचा डोंगर’ आणि सर्व कागदपत्रे मिळण्याच्या दरम्यान फ्लॅट क्रमांक ५०३ येथे थांबली आहे. ईडीची टीम या फ्लॅटचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हा फ्लॅट उघडण्यात ईडीला यश आलेले नाही. ईडीची टीम गुरुवारी पुन्हा एकदा पंडित्य रोड अपार्टमेंटच्या या फ्लॅटवर पोहोचली होती, मात्र त्याचे कुलूप उघडता आले नाही.
ईडीचे पथक प्रथम रवींद्र सरोवर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे ईडीचे पथक पोलिसांसह फ्लॅटवर गेले आणि लॉक उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान दरवाजा तोडण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. यानंतर अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सचिवांशी संपर्क साधला. यानंतर सचिवांनी इमारतीचे कुलूप बनविणाऱ्यांशीही ओळख करून दिली, तरीही अधिकाऱ्यांना यश आले नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा फ्लॅट सुमारे पाच वर्षांपासून बंद आहे. मात्र, अनेकवेळा मालक बदलल्याने आता त्याची चावी मिळणे कठीण झाले आहे.
या मालमत्तेची नोंदणी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहे असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. पण पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची ही बेनामी मालमत्ता आहे. 2012 पासून पार्थ आणि अर्पिताच्या भागीदारीत सुरू असलेल्या या प्रकरणात आतापर्यंत ईडीला एका कंपनीचे कागदपत्र मिळाले आहेत. याशिवाय, ईडीला दोन संयुक्त बँक खाती देखील मिळाली आहेत ज्यातून त्या कंपनीसाठी चार फ्लॅट खरेदी केले होते, शांतीनिकेतनमध्ये 2012 मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची कागदपत्रे आणि अर्पिताच्या नावावर 31 विमा पॉलिसी, ज्यामध्ये पार्थ वारसदार आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, यावरून हे सिद्ध होते की या दोघांची 2012 पासून एकमेकांशी ओळख आहे.
Partha Chatterjee Arpita Mukherjee ED Enquiry Flat Suspense