अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक धरणे भरून वाहू लागली आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथील ब्रिटिश कालीन मातीचे परसुल धरण आज सकाळी ओव्हरफ्लो होऊन सांडव्या वरून पाणी परसुल नदीत वाहू लागल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. उमराणेसह लगतच्या ५ ते ६ गावांच्या पाणी पुरवठा योजना यावर असल्याने या गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चांदवड तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे डोंगर रांगा मधून येणाऱ्या पाण्यामुळे धरणात पाणी साठा वाढला होता. आज सकाळी परसुल धरणातून पाणी सांडव्यावरून प्रवाहित झाल्याने उमराणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे.