मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये असल्याचे ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. परमबीर सिंग कुठे गायब झाले ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यात ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यामुळे परमबीर सिंग हे कुठे आहे याबाबत चर्चा सुरु झाली. त्यानंतर निरुपम यांचे हे ट्विट समोर आले आहे.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण, नंतर परमवीर सिंग यांच्यावरच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर ते फरार झाले. आता ते पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी ते फरार असल्याचे सांगितले. पण, निरुपम यांनी ते बेल्जियमला असल्याचे सांगितले. ते बेल्जियमला कसे गेले ? त्यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला ? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का ? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
ये हैं मुंबई पुलिस के पूर्व पुलिस कमिश्नर।
मंत्री पर हफ्ता वसूली का आरोप लगाया था।
खुद पाँच मामलों में वांटेड हैं।पुलिस ने कहा है कि ये फरार हैं।
पता चला है,ये बेल्जियम में है।
बेल्जियम गया कैसे?
इसे किसने सेफ पैसेज दिया?
क्या हम अंडरकवर भेजकर इसे ला नहीं सकते ?#ParambirSingh pic.twitter.com/NwYMh6vV74— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 30, 2021