नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविषयी अवमान जनक आणि वादग्रस्त वक्तव्य करण्याची राजकीय नेत्यांमध्ये जणू काही चढाओढ लागलेली आहे. विशेषतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता त्रिवेदी, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड आदींनी अनेक बेताल वक्तव्य केल्याने तमाम महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत हिवाळी अधिवेशात देखील आवाज उठविला. त्याचवेळी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत असताना त्यांना खाली बसण्याचा आदेश देण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांचा माईक देखील बंद पाडण्यात आला, त्यामुळे डॉ. कोल्हे संतप्त झाले आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दि. ८ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यात सुरू असलेल्या शिवरायांच्या वक्तव्यावर लोकसभेत आवाज उठवला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर सगळ्या भारताचे आराध्य दैवत आहेत. शिवराय आमच्यासाठी देव नाही, पण देवापेक्षाही कमी नाहीत, असे असताना देखील महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य केले जात आहेत, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच मध्येच त्यांच्या माईक बंद करण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी छत्रपती शिवराय यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच नेमके त्याच वेळी त्यांनी दोन तीन वाक्य बोलत नाही, तोच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज दाबला. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी ‘हो गया हो गया… ‘ म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्याचवेळी डॉ. कोल्हे यांनी आम्ही बोलण्याची असे म्हटले परंतु त्यांना बोलू दिले नाही म्हणून कोल्हे चांगलेच संतप्त झाले होते. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. संसदेत घडलेल्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला. त्यादरम्यान अध्यक्षांनीही सभागृह दोन वाजेपर्यंत कामकाज तहकुब केले. त्यामुळे अमोल कोल्हे चांगले संतापले आहेत.
संसदेबाहेर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच महाविकास आघाडी च्या खासदारांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला इतकेच नव्हे तर कोल्हेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात अवमानजनक वक्तव्य केली जात आहेत. आता त्यासंदर्भात ठोस कायद्याची तरतुद व्हावी, जेणेकरून कोणीही शिवरायांबद्दल असे वक्तव्य करू नये, यासाठी सभागृहात वेळ मागितला होता. मला वेळ देण्यात आला पण अवघ्या दोन-तीन मिनीटांमध्ये माझा माईक बंद करण्यात आला. आज जरी माईक बंद करण्यात आला असला तरी, शिवभक्ताच्या भावना आणि त्यांचा आवाज बंद करता येणार नाही, तो कानठळ्या बसवल्या शिवाय राहणार नाही, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही!!
जय भवानी, जय शिवराय??#ParliamentWinterSession #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivray pic.twitter.com/XlUVy3ipEu— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 8, 2022
Parliament Dr Amol Kolhe Mike Switched Off