नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विरोधकांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या संसदेमध्ये चर्चा होत आहे. मणिपूर हिंसाचारासह विविध कारणांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर विविध नेत्यांनी सरकारवर आगपाखड केली. काँग्रेस नेते राहुल गाधी यांनी काल तडाखेबंद भाषण करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा थेट आरोप राहुल यांनी केला. त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला. आज या सर्व चर्चेला आणि अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. संसदेत त्यांचे भाषण सुरू झाले आहे.
बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण
Parliament No Confidence Motion PM Narendra Modi Live
New Delhi Monsoon Session Prime Minister