इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याच्या निर्णयाच्या विरोधत ठाकरे बंधू ५ जुलै रोजी एकत्र मोर्चा काढणार आहेत. या विषयावर बोलतांना भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्याकरता यांचे मराठीप्रेम जागृत होते असे सांगत त्यांनी निशाणा साधला.
आमदार फुके म्हणाले की दोन्ही ठाकरे बंधुची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही, दोन्ही भावजया एकत्र यायला पाहिजेत.. तर काहीतरी होऊ शकेल असा टोलाही त्यांनी लगावला.
उध्दव ठाकरे यांनी भाजपने ज्यांना मांडीवर घेतला आहे ती असली शिवसेना नाही असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला होता.. यावर आमदार फुके यांनी सांगितले की, उध्दव ठाकरे यांना भाजपच्या मांडीवर येऊन बसायचे आहे का, त्यांच्या मनात असलेलं तोंडात आलं असेही ते म्हणाले.
आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरही परिणय फुके यांनी भाष्य केलंय. यावेळी परिणय फुके यांनी म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल करत म्हटले जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होते,
या टीकेनंतर सोशल मीडीयावर फुके यांच्यावर टीका करतांना एकाने तुझ्या नावातच “फुके” आहे, जरा कमी फुकत जा. त्यामुळे तुझी ठाकरेंवर टीका करायची लायकी नाही. ठाकरे रात्री इंग्लिश पितात हे तुला कसं समजलं? तू काय त्यांच्या घरचा नोकर आहेस का? त्यांच्या ग्लासात राहिलेली उष्टी पितोस वाटतं म्हणून तुला सगळी माहिती आहे.. वशिल्यावर आमदार झालेल्या माणसाने स्वतःची लायकी पाहून इतरांवर टीका करावी.