नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. गेल्या काही वर्षांपासून मोदी हे विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमाद्वारे हितगुज साधतात. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मोदींनी दिली. देशातील ३८ लाख विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी एक गंभीर बाबही स्पष्ट केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात आता गॅझेट वापरकर्त्यांचा स्क्रीन-टाइम सरासरी सहा तास आहे. हे निश्चितपणे दर्शवते की एखाद्या व्यक्तीने मूर्खपणाने आणि उत्पादकतेशिवाय किती वेळ आणि ऊर्जा वाया घालवली आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि लोकांच्या सर्जनशीलतेला धोका आहे. एखाद्या देशातील नागरिक तब्बल ६ तास स्क्रीनवर घालविणे ही बाब अतिशय चिंतानजक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कधी कधी असे घडते की टीकाकार कोण, हे महत्त्वाचे असते. जे तुमचे आहे ते तुम्ही म्हणाल तर तुम्ही ते सकारात्मकपणे घ्या. पण तुम्ही जे बोलता ते पटले नाही तर राग येतो. टीकाकार सवयीने करत असतील तर त्यांना डब्यात टाका. कारण त्यांचा हेतू काही वेगळाच आहे.
मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की आधी काम समजून घ्या… कशाची गरज आहे यावरही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर मला काही साध्य करायचे असेल तर मला एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल… तरच मला निकाल मिळेल. आपण ‘स्मार्टली हार्डवर्क’ केले पाहिजे तरच चांगले परिणाम मिळतील.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेळेच्या व्यवस्थापनाची जाणीव ठेवली पाहिजे. तुम्ही असा स्लॅब बनवता की आधी तुम्हाला कमी आवडणाऱ्या विषयाला वेळ द्या… त्यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या विषयाला वेळ द्या.
बघा, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
It is an absolute delight to be among my young friends! Join #ParikshaPeCharcha. https://t.co/lJzryY8bMP
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2023
Pariksha Pe Charcha PM Narendra Modi Live