मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक गट – ब, वैज्ञानिक सहायक गट – क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) गट – ब आणि वैज्ञानिक सहायक संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) गट – क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
यासाठी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युर्निवर्सिटी यांच्यामार्फत 5 व 7 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेबाबत सुधारित वेळापत्रक व ठिकाण नव्याने कळविण्यात येईल, असे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.