पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दौंड तालुक्यातील पारगाव येथील गायराण जमिनीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी आरक्षित असलेली पावणे चार एकर जमीन खोटी कागदपत्रे सादर करून वक्फ बोर्ड कडे परस्पर नोंद करून हस्तांतरित करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याचा निषेध म्हणून संपुर्ण पारगाव बंद ठेवण्यात आला. गावातील आठवडे बाजारही कडकडीत बंद ठेवण्यात आला. याबाबत प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्यने स्थानिक गावकरी व विविध हिंदुत्वादीं संघटनेची पदाधिकारी उपस्थित होते.
Pargaon Garden Land Controversy