मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्याला घरबसल्या एखादी वस्तू किंवा पार्सल हवे असल्यास डिलिव्हरी बॉय तातडीने आपल्या घरी येतो. परंतु यापुढे डिलिव्हरी बॉय ऐवजी हे काम करणार ड्रोन आहे. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु हे प्रत्यक्षात खरे होणार आहे. लवकरच ग्राहकांच्या घरी डिलिव्हरी बॉय ऐवजी ड्रोन येईल आणि योग्य पार्सल पोहोचवेल.
Zypp इलेक्ट्रिक या डिलिव्हरी कंपनी सांगितले की, आम्ही ड्रोन लॉजिस्टिक विभागात प्रवेश करत आहोत आणि यासाठी त्यांनी TSAW ड्रोन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. तसेच या निवेदनानुसार, झिप इलेक्ट्रिक पहिल्या टप्प्यात चार शहरांमध्ये सुमारे 200 ड्रोन तैनात करेल. या सेवा प्रथम दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुणे अशा काही शहरांमध्ये सुरू करण्याची योजना आहे. जिथे Zypp इलेक्ट्रिक अस्तित्वात आहे.
या कंपनीच्या म्हणण्यानुसार, तैनात केलेले सर्व ड्रोन स्मार्ट लॉकर्सने सुसज्ज असतील, जे केवळ ग्राहकांना प्रदान केलेल्या ओटीपीद्वारे उघडले जाऊ शकतात. अशा प्रकारे, डिलिव्हरीच्या वेळी, हे उत्पादन किंवा वस्तू फक्त योग्य हातात पोहोचेल. यापुर्वी आपण एखाद्या लग्नसमारंभात ड्रोन कॅमेरा पहिला असेल, या ड्रोन कॅमेराने काय करता येऊ शकते, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. परंतु या द्वारे अनेक उपयोगी कामे करता येतात.
अगदी छोटे ड्रोन मुले खेळणी म्हणून वापरू शकता. तसेच उंचवरील ठिकाणी वस्तु पोचवायची असेल, रुग्ण वृद्धाला तातडीने औषध पाठवायचे असेल, कुठल्या उंचावरील ठिकाणी टेहळणी करायची आहे किंवा छायाचित्रण करायचे आहे का? ड्रोन सेवेला हजर असतो इतकेच नव्हे तर हेरगिरीसाठी लष्करात त्याचे अनेक उपयोग आहेत.
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने ग्रामीण भागात 50 लाख रोजगार निर्माण होऊ शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील वर्षी सांगितले होते. तसेच आपल्या देशात राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदावर असलेल्या महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चिंतेचा विषय राहीला आहे. विशेषत: पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या काळात सुरक्षेचा प्रश्न अधिकच चर्चेचा बनतो, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आता हा खास ड्रोन तैनात करण्यात येणार आहे.
सध्या Zypp इलेक्ट्रिक ही डिलिव्हरी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे वैद्यकीय, खाद्यपदार्थ, किराणा यांसारखी उत्पादने पुरवते. ज्या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करणे कठीण किंवा अशक्य आहे अशा ठिकाणीही ड्रोनमुळे वितरण सोपे होईल. तसेच ड्रोन आल्याने डिलिव्हरीचा वेळही कमी होणार आहे.
Zypp इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक आणि सीईओ आकाश गुप्ता म्हणाले की, त्यांना विविध ठिकाणी डिलिव्हरी सुलभ आणि स्मार्ट बनवायची आहे. “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रोन ही इलेक्ट्रिक वाहने उडवत आहेत आणि ती आमच्या ई-स्कूटर्सच्या ग्राउंड फ्लीटमध्ये जोडली जाणार आहेत. त्यांचा उपयोग वैद्यकीय, खाद्यपदार्थ, किराणा मालाची वाहतूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.