परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील तरुणाई ही नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्यात जणू काही वेडी झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोणत्याही शहरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला की तेथे गडबड आणि गोंधळ होतो, यापूर्वीही नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, जळगाव या शहर व जिल्ह्यांमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी काही ठिकाणी गोंधळ झाला होता. आता मराठवाड्यातील परभणी शहरात अशाच प्रकारे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना तेथे गडबड व गोंधळ झाल्याने पोलिसांना तरुणांवर लाठीमार करावा लागला.
अनेक खुर्च्यांची मोडतोड
‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी ‘ असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे ‘बनी तो बनी नाही तर परभणी ‘ असे देखील म्हटले जाते. परभणी शहर हे मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या शहराने एक आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असून याच वेळी परभणीमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा डान्स आकर्षण ठरला. भाजपचे आनंद भरोसे यांनी गौतमी पाटीलच्या उपस्थितीत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केलं होते. कार्यक्रमात गोंधळ झाल्याने गौतम पाटील आणि तिच्या सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये पाठवण्यात आले आणि त्यानंतर तरूणाच्या जमावाला शांत करुन दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कारण गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची एकच गोंधळ केला आणि काही तरुणांनी कार्यक्रमस्थळावरील अनेक खुर्च्यांची मोडतोड केली. यानंतर जमावाला आवर घालण्यासाठी आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी तरुणांवर सौम्य लाठीमार केला.
अर्धा तास हा गोंधळ
आपल्या महाराष्ट्रात तरुणांना एखाद्या गोष्टीची वेळ लागले की मग त्याची लोन सर्वत्र पसरत जाते, विशेषतः एखादी गाणे असो की, सांस्कृतिक कार्यक्रमाला एखाद्या शहरात त्याची तुफान गर्दी झाली की मग दुसऱ्या शहरात तसाच कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, त्यामुळे एखादा कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतो, गौतमी पाटीलच्या बाबतीतही असेच म्हणता येईल तिचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. आता परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर प्रसिद्ध नृत्यांगणा गौतम पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, परभणीतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सांयकाळी ७ वाजता सुरू झाला मात्र मुख्य कलाकारांचा स्टेजवर पत्ता नव्हता आणि ८.३० गौतमी पाटील आणि त्यांच्या सहकारी आल्या, त्यांनी एक नृत्य सुरू केले. यानंतर जमलेल्या अनेकांनी हुल्लडबाजी सुरू केली. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. यानंतर खुर्च्या फेकफेकी, तोडफोड सुरू झाली. पोलिसांनी ह्या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. हा प्रकार सुरू झाला आणि गौतमी पाटील आणि त्यांच्या सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेल्या. त्यानंतर जमाव शांत झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
Parbhani Dancer Gautami Patil Program Police Lathi Charge