इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्राजंल खेवलकर यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी आज न्यायालयात दिली. खेवलकर यांनी एका मुलीचे व्हिडिओ दुस-या आरोपीला पाठवत एेसा माल चाहिए असा मेसेज केल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात पोलिसांनी छापेमारी केली होती. यात पाच पुरुष तर २ महिलांना अटक करण्यात आली होती. आज याप्रकरणात कोर्टाने खेवलकरांसोबत पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्राजंल खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
प्राजंल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलिस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.